मुंबई, उपनगरातील पाणीपुरवठा खंडित

पश्चिम उपनगर आणि शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे
मुंबई, उपनगरातील पाणीपुरवठा खंडित

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रातील ट्रान्सफार्मरला सोमवारी सायंकाळी आग लागली. या घटनेमुळे पूर्व उपनगरांतील भाग तसेच मुंबई शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नसल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे. पश्चिम उपनगर आणि शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in