Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

गिरगाव, भुलेश्वर, चर्नी रोड, नागपाडा परिसरात मुंबई महापालिकेच्या बी व सी विभागाने फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, बेकायदा चार स्टॉल, तात्पुरत्या ११ शेड्स बुलडोझर फिरवला.
Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले
Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले
Published on

मुंबई : गिरगाव, भुलेश्वर, चर्नी रोड, नागपाडा परिसरात मुंबई महापालिकेच्या बी व सी विभागाने फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, बेकायदा चार स्टॉल, तात्पुरत्या ११ शेड्स बुलडोझर फिरवला. मुंबई महापालिकेच्या वार्डने कारवाई करत तीन मोठ्या लॉरी भरून अतिक्रमित साहित्य हटवले.

दक्षिण मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल रोड गिरगाव, भुलेश्वर, चर्नी रोड, नागपाडा आदी दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरील फुटपाथवर विविध प्रकारचे तात्पुरते अतिक्रमण करण्यात आल्याने पादचाऱ्यांना चालताना अडचणी निर्माण होत होत्या.

अखेर पादचारी प्रथम अभियानांतर्गत बी विभागांतर्गत पालिकेच्या पथकाने फुटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला. या कारवाई ११ तात्पुरत्या शेड्स तोडल्या, तर चार बेकायदा स्टॉल हटविण्यात आले. याशिवाय फूटपाथवर ठेवण्यात आलेले विविध अतिक्रमित साहित्य जप्त करून तेथून हटविण्यात आले.

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर त्यांचा वापर करतात. मात्र फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून चालत जावे लागते. अखेर मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पादचारी प्रथम अभियान हाती घेतले आहे. त्यावेळेपासून आयुक्तांच्या निर्देशानुसार रोज कारवाई करण्यात येत असल्याचे बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी सांगितले.

फूटपाथ हे प्रामुख्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी असतात. मात्र, फूटपाथवर स्टॉल, शेड्स तसेच विविध साहित्य ठेवून अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येते. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे एसव्हीपी रोडवरील संबंधित फूटपाथ मोकळा झाला असून पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी आणि कारवाई करण्याची गरज आहे.

रस्ता झाला सुरक्षित

पालिकेच्या या कारवाईमुळे सरदार वल्लभभाई पटेल रोड पादचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा चालण्यासाठी सुरक्षित झाला आहे. सी विभागांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून पालिकेची ही कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा सी विभागाने दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in