Mumbai : दंड रद्द करा, अन्यथा झाडावरून उडी मारतो; टॅक्सीचालकाच्या धमकीमुळे पोलिसांची पळापळ

घटना सकाळी सुमारे १० वाजता घडली, जेव्हा तो व्यक्ती झाडाच्या शेंड्यावर बसून उडी मारण्याची धमकी देताना दिसला. त्या व्यक्तीची भाषा व वर्तन समजणे अवघड जात होते. अधिकारी जवळ गेल्यावर तो उडी मारण्याची धमकी देत होता, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.
Mumbai : दंड रद्द करा, अन्यथा झाडावरून उडी मारतो; टॅक्सीचालकाच्या धमकीमुळे पोलिसांची पळापळ
Mumbai : दंड रद्द करा, अन्यथा झाडावरून उडी मारतो; टॅक्सीचालकाच्या धमकीमुळे पोलिसांची पळापळ
Published on

मेघा कुचिक / मुंबई

वाहतूक पोलिसांनी दंड केल्याच्या निषेधार्थ विधानभवनाबाहेर एका टॅक्सीचालकाने झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास चाललेल्या या नाट्यानंतर कुलाबा येथील कफ परेड पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला खाली उतरवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने दंड झाल्यानंतर 'आपले प्राण वाचवण्यासाठी' झाडावर चढल्याचा दावा केला. कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी अखेर त्याला समजावून खाली उतरवले. पोलिसांनी सांगितले की तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि काहीतरी अस्पष्ट बडबड करत होता. पुढील तपास सुरू आहे.

घटना सकाळी सुमारे १० वाजता घडली, जेव्हा तो व्यक्ती झाडाच्या शेंड्यावर बसून उडी मारण्याची धमकी देताना दिसला. त्या व्यक्तीची भाषा व वर्तन समजणे अवघड जात होते. अधिकारी जवळ गेल्यावर तो उडी मारण्याची धमकी देत होता, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

बराच वेळ समजावण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड स्वतः झाडावर चढले आणि शांतपणे त्या व्यक्तीशी संवाद साधला. त्यांनी त्याला त्याच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन देत शांत केले.

त्या व्यक्तीचे विधान विसंगत होते- कधी तो वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा उल्लेख करत होता, तर कधी 'मराठी लोकांना फेरी लावू देणार नाही' आदी असंबद्ध गोष्टी बोलत होता. गायकवाड यांनी संयम व कौशल्य दाखवत अखेर त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे संपूर्ण नाटय सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालले.

त्या व्यक्तीची ओळख संपत चोरमाळे (वय ३२) अशी झाली असून तो डोंगरी येथे राहतो आणि खासगी ॲपसाठी टॅक्सी चालवतो. पोलिसांनी सांगितले की तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि सध्या त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले की, तपासणीच्या अहवालानुसार पुढील कारवाई ठरवली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in