

मेघा कुचिक
मुंबईः लोकल ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर प्रवाशाने हल्ला केल्याची आणखी एक घटना शनिवारी समोर आली. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी निलेश नंदू याच्याविरोधात तिकीट तपासनीसावर (टीसी) हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमितकुमार महातो १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता महातो हे त्यांचे सहकारी राजकुमार पंडित आणि राजकुमार सिंह यांच्यासह तिकीट तपासणीसाठी दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या एसी फास्ट लोकलमध्ये चढले.
लोकल मालाड रेल्वे स्थानकातून जात असताना सिंह यांनी ७१०८ए क्रमांकाच्या डब्यातील एका प्रवाशाला तिकीट दाखवण्यास सांगितले. त्यावेळी रेल्वे वन अप काम करत नसल्याने तिकीट दाखवता येत नसल्याचे प्रवाशाने सांगितले.