
मुंबई : दादरमधील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर ४० वर्षीय शिक्षिकेने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेला वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवत होती. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्याचा तणाव पाहता कुटुंबियांना चिंता वाटली. त्यांनी या मुलाला विश्वासात घेतले. त्यावेळी त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली.
याप्रकरणी आरोपी शिक्षेकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षका विवाहीत असून तिला एक मुलगा आहे. डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. जानेवारी २०२४ मध्ये या शिक्षिकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यावर अत्याचार केला होता.
बदनामीच्या भीतीने तक्रार करणे टाळले
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना या घटनेबाबत कळले होते. मात्र, बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रार केली नाही. काही दिवसांनी ही शिक्षिका आपल्या मुलाचा पाठलाग सोडेल, असे त्यांना वाटत होते. परंतु तसे झाले नाही. त्या शिक्षेकेने त्रास देणे सुरूच ठेवले होते. अखेर मुलाची मानसिक स्थिती पाहून अखेर कुटंबियांनी पोलिसांत तक्रार केली.