

मुंबई : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या तीन हजार मिमी व्यासाची जलवाहिनी कामाची एमएमआरडीएच्या चाचपणी सुरू असताना फुटली. घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून उद्यापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून दुरुस्तीचा खर्च याबाबत एमएमआरडीएला पत्र लिहिणार असल्याचे जल विभागातील धिकाऱ्याने सांगितले.
ठाण्यात तीन हात नाका परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून काम हाती घेण्यात येणार आहे. कामाला सुरुवात करण्याआधी जमिनीखाली काही युटीलिटीज आहे का, याची चाचपणी एमएमआरडीएकडून सुरू होती. त्याच दरम्यान तीन हजार मिमीची जलवाहिनी फुटली. हे कळताच मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.