Mumbai : भय इथले संपत नाही! हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत; भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर भागात धोका

पावसाळा म्हटलं की भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, साकीनाका याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे.
Mumbai : भय इथले संपत नाही! हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत; भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर भागात धोका
Mumbai : भय इथले संपत नाही! हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत; भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर भागात धोका(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : पावसाळा म्हटलं की भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, साकीनाका याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. याठिकाणी सुमारे ८० हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. भांडुप येथे दरड कोसळण्याचे १३ डेंजर स्पॉट असून ७०० कुटुंबीयांना स्थलांतरित होण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचे भांडुप एस वॉर्ड विभागाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता कुर्ला कसाईवाडा येथील दोन ते अडीच हजार बाधित कुटुंबांना स्थलांतरित व्हावे यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच डोंगरावरील कुटुंबांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे कुर्ला एल वॉर्डचे सहायक आयुक्त धनाजी हेलेकर यांनी सांगितले.

डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाची काळजी घेत कोट्यवधी रुपये खर्चून संरक्षक भिंत उभारणे अशी कामे केली जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. तरीही दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत असून भय इथले संपत नाही. दरम्यान, याठिकाणी राहत असलेल्या लोकांना पावसाळ्यात चार महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे यासाठी नोटीस बजावण्यात येते किंवा बजावण्यात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai : भय इथले संपत नाही! हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत; भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर भागात धोका
विषारी दारूचे १७ बळी; पुणे-पिंपरीत हाहाकार, ८ जणांना अटक

भांडुप, विक्रोळी कांजूर मार्ग याठिकाणी डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असून भांडुपमध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे. तर घाटकोपर मध्ये दरड कोसळण्याचा धोका असून याठिकाणी सुमारे चार हजार झोपड्या आहेत. तर कुर्ला कसाई वाडा येथे दरडीच्या छायेत २ ते २२०० कुटुंब वास्तव्यास आहेत. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतरित व्हावे यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचे हेलेकर यांनी सांगितले.

पावसाळ्यात कधीही घटना घडू शकते हे माहीत असताना अनेक जण पालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते. डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाची काळजी घेत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारावर राहणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येते. नोटीस बजावल्यानंतर ही संबंधित कुटुंब स्थलांतरित होण्यास तयार नसेल तर ती व्यक्तीच्या जबाबदारी त्याठिकाणी राहते, असे पालिकेच्या नोटिशीत नमूद केले जाते.

पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रक लावत जनजागृती!

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, साकीनाका या ठिकाणी दरड कोसळण्याच्या दृष्टीने डेंजर झोनमध्ये आणले आहे. दरम्यान, कोणाच्या जीवावर बेतू नये यासाठी पावसाळ्यात चार महिने स्थलांतरित व्हावे म्हणून नोटीस, म्हणून नोटीस बजावण्यात येते. तसेच पोस्टर्स, बॅनर्स, फलक, माइकवरून अनाऊन्समेंट केली जाते, असे हेलेकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in