सेक्स रॅकेटप्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक; दोन अल्पवयीन मुलींची केली सुटका

सेक्स रॅकेटप्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक; दोन अल्पवयीन मुलींची केली सुटका

सेक्स रॅकेटप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश असून, त्यांच्या तावडीतून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.
Published on

मुंबई : सेक्स रॅकेटप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश असून, त्यांच्या तावडीतून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

अल्पवयीन मुलींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालविणारी एक टोळी असून, या टोळीचे काहीजण अल्पवयीन मुलींना घेऊन कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती युनिट पाचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकाने गुरुवारी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे दोन महिलांसह तिघेही दोन अल्पवयीन मुलींना घेऊन आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत ते तिघेही अल्पवयीन मुलींच्या मदतीने शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्या तावडीतून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका केली. या दोन्ही मुलींना नंतर सुधारगृहात पाठविण्यात आले.

अटक आरोपींमध्ये सबिना आफ्ताब मलिक, आफ्ताब उस्मान मलिक आणि मेहजबी निहाल शेख यांचा समावेश असून, अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in