Mumbai : कोचिंग क्लास चालवणाऱ्या तिघा भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक

कोचिंग क्लासमधील एका १५ वर्षांच्या मुलीवर क्लासच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Mumbai : कोचिंग क्लास चालवणाऱ्या तिघा भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक
Published on

मुंबई : कोचिंग क्लासमधील एका १५ वर्षांच्या मुलीवर क्लासच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वत: पीडित मुलीने कथित अत्याचाराची माहिती दिल्यानंतर क्लास चालवणाऱ्या तिघा भावांना (मुख्य आरोपीसह त्याच्या दोन लहान भावांना) पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारविरोधी कायदा, पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दक्षिण मुंबईतील एका कोचिंग क्लासला येणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर २०२२ पासून लैंगिक अत्याचार सुरू होते़, अशी माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. मुख्य आरोपी २७ वर्षांचा असून तो व त्याचे दोन लहान भाऊ मिळून कोचिंग क्लास चालवत होते.

मुख्य आरोपीने २०२२ ते डिसेंबर २०२३ या काळात पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. आरोपी पीडितेला सकाळी लवकर क्लासला बोलावून उशिरापर्यंत थांबवून ठेवत असे. आरोपी तिला प्रौढांसाठीच्या सिनेमाला घेऊन जात असे, अयोग्य पद्धतीने स्पर्श आणि अश्लील हावभाव करीत असे. आरोपीच्या भावाकडूनही असाचा त्रास होत होता, असे पीडितेने आपल्या आरोपात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीच्या वागण्यातील बदल तिच्या आईला जाणवल्यानंतर आईने मुलीचे समुपदेशन केले असता, मुलीने लैंगिक अत्याचाराची घटना कथन केली. त्यातून तिघा भावांच्या गुन्हेगारी कृत्याला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत शनिवारी दोघांना तर रविवारी अन्य एका भावालाही अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in