सावधान! समुद्र होणार बेभान; यंदा २५ दिवस समुद्र खवळणार

जून ते सप्टेंबर दरम्यान २५ दिवस ४.८० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार
सावधान! समुद्र होणार बेभान; यंदा २५ दिवस समुद्र खवळणार

यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला तब्बल २५ दिवस मोठी भरती येणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान २५ दिवस ४.८० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे. त्यामुळे यंदाच वरीस धोक्याच असून मुंबईकरांनी भरतीच्या वेळी समुद्रा जवळ जाणे टाळा, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत दरवर्षी हलक्या सरीचा पाऊस पडला तरी सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते. त्यात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्रात तब्बल २५ दिवस साडेचार मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यावर्षी जूनमध्ये ५ तर जुलैमध्ये प्रत्येकी सहा वेळा, ऑगस्टमध्ये ८, तर सप्टेंबरमध्ये ६ दिवस समुद्राला उधाण येणार आहे.

पावसाळ्यात सुरुवातीला म्हणजे ४ ते ८ जून रोजी सलग पाच दिवस हायटाईड असणार आहे. या दरम्यान समुद्रात ४.५१ ते ४.६९ मीटर उंच लाटा उसळतील. आणि जुलैमध्येही सहा दिवस समुद्रात हायटाइड असणार असून ४.७७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जुलै महिना पावसाचा असतो. याचवेळी पाऊस कोसळल्यास सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे यावेळची स्थिती आव्हानात्मक असेल. याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग सहा दिवस आणि महिना अखेरला ३० व ३१ ऑगस्टला ८ दिवस हायटाईड असेल. यावेळी ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीचे तीन व महिन्या अखेरेला तीन दिवस असे सहा दिवस समुद्रात लाटा उसळणार असल्याने सखलभागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

जून महिन्यातील भरती

दिनांक वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)

४ जून १२.१६ वा. ४.६२ मी

५ जून १३. ०१ वा. ४.६९ मी

६ जून १३.४७ वा. ४.६९ मी

७ जून १४.३५ वा. ४.६४ मी

८ जून १५.२५ वा. ४.५१ मी

जुलै महिन्यातील भरती

दिनांक वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)

३ जुलै १२.०२ वा. ४.६० मी

४ जुलै १२.४९ वा. ४.७२ मी

५ जुलै १२.३६ वा. ४.७८ मी

६ जुलै १२.२३ वा. ४.७७ मी

७ जुलै १२.१० वा. ४.६९ मी

८ जुलै १२.५५ वा. ४.५२ मी

ऑगस्ट महिन्यातील भरती

दिनांक वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)

१ ऑगस्ट ११.४६ वा. ४.५८ मी

२ ऑगस्ट १२.३० वा. ४.७६ मी

३ ऑगस्ट १३.१४ वा. ४.८७ मी

४ ऑगस्ट १३.५६ वा. ४.८७ मी

५ ऑगस्ट १४.३८ वा. ४.८७ मी

६ ऑगस्ट १५.२० वा. ४.५१ मी

३० ऑगस्ट ११.२६ वा. ४.५९ मी

३१ ऑगस्ट १२.०६ वा. ४.८० मी

सप्टेंबर महिन्यातील स्थिती

दिनांक वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)

१ सप्टेंबर १२.४४ वा. ४.८८ मी

२ सप्टेंबर १३.२२ वा. ४.८४ मी

३ सप्टेंबर १.५२ वा. ४.६४ मी

२८ सप्टेंबर ११.०० वा. ४.५६ मी

२९ सप्टेंबर ११.३७ वा. ४.७१ मी

३० सप्टेंबर ८.०० वा. ४.७४ मी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in