मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून; ४५ मिनिटांत अंतर पूर्ण करणे शक्य

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती
मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून; ४५ मिनिटांत अंतर पूर्ण करणे शक्य

मंगळवार, १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. वॉटर टॅक्सीसाठीचं बुकिंग सुरू झाली असून ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे.

जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटा दरम्यान ही सेवा सुरू आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात टॅक्सी सेवा सकाळी १०.३० पासून मुंबई क्रूझ टर्मिनलवरुन उपलब्ध होईल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल केला जाणार आहे. गेट वे ऑफ इंडियावरुन टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in