मुंबईतील जुळ्या बहिणींची गगनभरारी; संस्कृती-श्रृती पहिल्याच प्रयत्नात CA

संस्कृती पारोलिया हिने 599 गुण मिळवत देशात दुसरी येण्याच मान मिळवला असून श्रुतीने आठवा क्रमांक मिळवला आहे. संस्कृतीही इंटरमिजिएट परीक्षेतही देशात तिसरी आली होती. तर, श्रृतीने चौथा क्रमांक पटकावला होता. या दोन्ही बहिनींचे वडील, मोठा भाऊ आणि वहिनी देखील सीए आहेत.
मुंबईतील जुळ्या बहिणींची गगनभरारी; संस्कृती-श्रृती पहिल्याच प्रयत्नात CA

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि सनदी लेखापाल (सीए) या भारतातील सर्वात अवघड परीक्षा समजल्या जातात. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात. मात्र, त्यापैकी बोटांवर मोजण्याइतके लोक त्यात यशस्वी होतात. काही जण तर अनेक वेळा परीक्षा देऊन देखील उत्तीर्ण होत नाहीत. तर, काही पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालतात.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात मुंबईत राहणाऱ्या दोन जुळ्या बहिणींनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे संस्कृती पारोलिया हिने 599 गुण मिळवत देशात दुसरी येण्याचा मान मिळवला असून श्रुतीने आठवा क्रमांक मिळवला आहे. संस्कृती ही इंटरमिजिएट परीक्षेतही देशात तिसरी आली होती. तर, श्रृतीने चौथा क्रमांक पटकावला होता. या दोन्ही बहिणींचे वडील, मोठा भाऊ आणि वहिनी देखील सीए आहेत.

"मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून मला सीए व्हायचे होते. मला सीए म्हणजे काय हे माहितीही नव्हते, तेव्हाही मला सीए व्हायचे होते. मी कायमच बाबांना पाहिले होते. मला लहापणापासूनच गणिते आवडायची," असे संस्कृतीने सांगितले. तर, "मी आणि माझी बहीण आम्ही सगळ्या गोष्टी सोबत करतो. कारण आमच्या आवडी-निवडी, छंद सेमच आहेत. फ्रेंड्सही सेम आहेत. आम्ही एकाच शाळा आणि कॉलेजमध्ये होतो. आर्टिकलशिपही एकाच कंपनीत केली. त्यामुळे आमचे सर्कल सेम आहे", असे श्रृती म्हणाली.

दरम्यान, मधूर जैन याने सीए अंतिम परिक्षेत 619 गुण मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, मुबंईचा जय देवांग जिमुलिया याने 691 गुण मिळवत सीए इंटरमिजिएटमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.

logo
marathi.freepressjournal.in