लोखंडी मॅनहोलच्या झाकण चोरीप्रकरणी दोघांना अटक; पाच झाकणांची चोरी केल्याची कबुली

लोखंडी मॅनहोल झाकण चोरीप्रकरणी दोन आरोपींना एमएचबी पोलिसांनी अटक केली.
लोखंडी मॅनहोलच्या झाकण चोरीप्रकरणी दोघांना अटक; पाच झाकणांची चोरी केल्याची कबुली
Published on

मुंबई : लोखंडी मॅनहोल झाकण चोरीप्रकरणी दोन आरोपींना एमएचबी पोलिसांनी अटक केली. या दोघांची पाच लोखंडी झाकणांची चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दोन झाकणे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

राजेश तारक मंडल आणि माजिद आजिद शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पाच दिवसांपूर्वी दहिसर येथल जयवंत सावंत रोड, दिपा हॉटेलजवळ महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला मलनिस्सारण वाहिनीवर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले पाच लोखंडी झाकणे चोरीस गेले होते. हा प्रकार दुसऱ्या दिवशी लक्षात येताच महानगरपालिकेच्या वतीने एमएचबी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी मिरारोड येथून राजेश मंडल आणि माजिद शेख या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी ५० हजार रुपयांचे पाच लोखंडी झाकणे चोरी केल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in