मुंबई प्रदूषणाच्या गर्तेत; आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर केली टीका

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 312 वर गेला आहे, तर दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI)308 वर गेला
मुंबई प्रदूषणाच्या गर्तेत; आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर केली टीका

सलग चौथ्या दिवशी मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षा खराब आहे. मुंबई प्रदूषणाच्या गर्तेत अडकली आहे. कारण मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 312 वर गेला आहे, तर दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI)308 वर गेला आहे.

नवी मुंबई, माझगाव आणि चेंबूर भागातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 350 पार आहे, याचा अर्थ तो अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. नवी मुंबईचा AQI 368 ते चेंबूरचा AQI 363 वर आणि माझगावचा AQI 356 वर गेला आहे. अंधेरी आणि BKC मध्ये हवेची गुणवत्ता गंभीर आहे. अंधेरीचा AQI 319 आणि BKC चा AQI 312 वर गेला आहे. मुंबईतील हवा पुढील दोन दिवस प्रदूषित राहण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनबाबत सरकार गंभीर नसून यासंदर्भातील काम बंद पाडल्याची टीका होत आहे. सध्या सुरू असलेली मेट्रोची कामे, रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या आणि धुळीचा एकत्रित परिणाम यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आजारी व्यक्तींना आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता खराब असलेल्या ठिकाणी हृदय व फुफ्फुसाचे विकार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्क वापरणे फायदेशीर ठरेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in