मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प वादात; युवासेनेच्या सिनेट सदस्यांची हायकोर्टात धाव

मुंबई विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्पाला आक्षेप घेत युवासेनाच्या सिनेट सदस्यांची हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प वादात; युवासेनेच्या सिनेट सदस्यांची हायकोर्टात धाव
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्पाला आक्षेप घेत युवासेनाच्या सिनेट सदस्यांची हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच तो मनमानीकारक पद्धतीने मंजूर करून घेण्यात आल्याने हा अर्थसंकल्प रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या या याचिकेची न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती एम एम साठ्ये यांच्या खंडपीठाने आज या याचिकेची दखल घेत या प्रकरणावर शुक्रवारी २८ मार्चला सुनावणी निश्‍चित केली आहे.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेने १२ मार्च रोजी आयोजित केलेल्या सभेला सिनेट सदस्यांना बोलावण्यात आले. यावेळी या बैठकीत अचानक २०२५-२६ चा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला व प्रशासनाने तो मंजूर केला. याला आक्षेप घेत युवासेनाच्या सिनेट सदस्यां शीतल शेठ यांच्या वतीने अ‍ॅड. जयेश वाणी व अ‍ॅड. प्रशांत जाधव यांनी याचिका दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in