मुंबई विद्यापीठाचे कर्मचारी निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत; निर्णयासाठी ३१ डिसेंबरची मुदत; आंदोलनाचा इशारा

मुंबई विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या १२७ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मागील आठ वर्षांपासून निवृत्तीवेतन व अन्य लाभ मिळाले नाहीत. यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने निवृत्तीवेतन व अन्य लाभासंदर्भात ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मुंबई विद्यापीठाचे कर्मचारी निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत; निर्णयासाठी ३१ डिसेंबरची मुदत; आंदोलनाचा इशारा
मुंबई विद्यापीठाचे कर्मचारी निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत; निर्णयासाठी ३१ डिसेंबरची मुदत; आंदोलनाचा इशारा(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या १२७ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मागील आठ वर्षांपासून निवृत्तीवेतन व अन्य लाभ मिळाले नाहीत. यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने निवृत्तीवेतन व अन्य लाभासंदर्भात ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

मुंबई विद्यापीठात १९८५–९५ या कालावधीत तसेच त्यानंतर शासन अनुदानित पदांवर नियुक्त झालेल्या एकूण ३५४ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी १२७ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना लाभ विद्यापीठाकडून देण्यात आलेले नाहीत. त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता

मुंबई विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागातील विभाग प्रमुख डॉ. श्रीवरंमगई रामानुजम आणि सात सदस्यीय संशोधन चमूने पोर्टेबल ‘आरोग्य निरीक्षण उपकरण’ (हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईस) ची नाविन्यपूर्ण डिझाईन तयार केली आहे. या डिझाइनची युनायटेड किंगडममध्ये नोंदणी करण्यात आली आहे. हे आरोग्य निरीक्षण उपकरण रुग्णांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे.

उपकरणाच्या संकल्पना, डिझाइन आणि विकास प्रक्रियेत सर्व सदस्यांनी समान योगदान दिले आहे. डिझाइन आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरण वर्ग २४ मध्ये समाविष्ट असून, त्यात वैद्यकीय व प्रयोगशाळा उपकरणांचा समावेश होतो. डिझाइन हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइसेस आणि अप्लाइड इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

आरोग्य निरीक्षण प्रणाली, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल हेल्थ उपाययोजना यांद्वारे रुग्ण निरीक्षण, निदान प्रक्रिया व आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.

रुग्णसेवा अधिक प्रभावी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विकसित करण्यात आले असून, आरोग्यसेवा वितरण प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता त्यामध्ये असल्याचे संशोधक डॉ. श्रीवरमंगई रामानुजम यांनी सांगितले. या बहुविषयक संशोधनासाठी डॉ. नीलम शर्मा, अभिजित सुधाकर, डॉ. रवी शंकर पांडेय, डॉ. उपेन्द्र कुमार, डॉ. राजीव रंजन राय आणि डॉ. नितीश पाठक यांनी योगदान दिले आहे.

नोंदणीनंतर पुढील टप्प्यात उपकरणाच्या प्रोटोटाइपची पडताळणी, क्लिनिकल किंवा फील्ड चाचण्या, तसेच कार्यात्मक बाबींसाठी पेटंट संरक्षण घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात हे डिझाइन आरोग्य तंत्रज्ञान कंपन्यांना लायसन्स देणे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट व डिझाइन नोंदणी करून संरक्षण विस्तारण्याची शक्यताही तपासली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कारणांसाठी होणार उपकरणाचा वापर

-महत्त्वाच्या जैविक घटकांचे निरीक्षण : हृदयगती, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब यांसारख्या आरोग्यविषयक मोजमापांसाठी.

-रुग्ण निरीक्षण सुलभ करण्यासाठी : रुग्णालये, दवाखाने तसेच घरगुती उपचार व्यवस्थेमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची स्थिती सहजपणे पाहता यावी यासाठी.

-लवकर निदान व सतर्कता : आरोग्यात होणारे बदल त्वरित लक्षात येऊन संभाव्य धोके वेळीच ओळखता यावेत यासाठी.

-डिजिटल हेल्थ आणि टेलिमेडिसिनसाठी : दूरस्थ उपचार प्रणालीत रुग्णांची माहिती सुरक्षितपणे डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्यासाठी.

-वृद्ध, दीर्घकालीन आजारी व अतिदक्षता उपचारार्थ रुग्ण : सातत्यपूर्ण देखरेखीची गरज असलेल्या रुग्णांसाठी विशेषतः उपयुक्त.

logo
marathi.freepressjournal.in