Mumbai University : दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
Mumbai University : दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे करण्यात येत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्जhttps://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून भरता येतील.

त्याचबरोबर एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसही १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एमसीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ईमेल द्वारे प्रवेशासाठी लिंक पाठविण्यात आली आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (सत्र१ आणि २) च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी दिली़

logo
marathi.freepressjournal.in