दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ३० सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार करण्यात येत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in/ संकेतस्थळावरून भरता येतील.

एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसही ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एमसीए आणि एमएमएस या अभ्याक्रमांची प्रवेश परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ईमेल द्वारे प्रवेशासाठी लिंक पाठविण्यात आली आहे. पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (सत्र१ आणि २) च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसही मुदतवाढ देण्यात आली आहे. पदव्युत्तर प्रथम आणि द्वितीय वर्षासाठीचे एम.ए. (शिक्षणशास्त्र) चे प्रवेश आणि द्वितीय वर्ष एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (अकाऊंट/ मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज - https://idoloa.digitaluniversity.ac/    या संकेतस्थळावरून भरता येतील.

पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज - https://idoloa.digitaluniversity.ac/  या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना भरता येतील. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/    या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in