मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची सुवर्णसंधी; संशोधनपूरक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम; 'इथे' करा अर्ज

ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि त्याकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणारे संशोधक घडवणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची सुवर्णसंधी; संशोधनपूरक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम; 'इथे' करा अर्ज
Published on

मुंबई : ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि त्याकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणारे संशोधक घडवणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करत इतिहास विभागाने या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संशोधानपूरक, रोजगाराभिमुख आणि लवचिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर इतिहासाच्या माध्यमातून उज्ज्वल स्थापना भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.

यामध्ये मल्टिपल एन्ट्री-एक्झिट सुविधा देण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांना पहिल्या वर्षानंतर पदव्युत्तर डिप्लोमा घेऊन बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे तसेच विद्यापीठ एमएच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सोयही करण्यात आली आहे. संशोधनावर आधारित पदवी मिळवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए ७.५ पेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी 'बी.ए. इतिहास ऑनर्स विथ रिसर्च' हा विशेष चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

इतिहास विभागाची वैशिष्ट्ये

इतिहातील वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांडून नेहमी विद्यार्थ्यांना वर्गाच्या शिकवणी व्यतिरिक्त संशोधन, वेगवेगळ्या प्रशासकीय नोकरीमधील संधी यावर मार्गदर्शन केले जाते. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, दर आठवड्याला आयोजित केली जाणारी 'विशेष व्याख्यानमाला' यामध्ये इतिहासातील दुर्लक्षित पैलू, जागतिक ते प्रादेशिक, स्थानिक इतिहास आणि नवीन संशोधन पद्धतींवर चर्चा करण्यासाठी देशभरातील नामवंत संसाधन व्यक्ती आणि तज्ज्ञांना पाचारण केले जाते. एमएसह पीएचडी प्रवेशाची संधी संशोधनाचा कल असणाऱ्या भारतासह जगातील सर्व विद्यार्थ्यांना असून संशोधक विद्यार्थ्यांना येथे संशोधन पूर्ण उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले जाते.

इथे अर्ज करा

शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय, वस्तुसंग्रहालयशास्त्र आणि पुरातत्त्व क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमए (इतिहास) आणि 'बी.ए. इतिहास ऑनर्स विथ रीसर्च' च्या प्रवेशासाठी या गुगल लिंकवर पूर्व नोंदणी https://forms.gle/ybbsspLNCyVEGvjz7 आणि विद्यापीठाच्या https://muadmission.samarth.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यानगरी कलिना कॅम्पस सांताक्रूझ (पूर्व) येथे या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी विभागातर्फे विशेष समुपदेशन सत्रे घेतली जात आहेत. इतिहास विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन विशेष समुपदेशन सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी साळवी यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in