परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा; मे महिन्यात निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ राज्यात एकमेव

मुंबई विद्यापीठामार्फत मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यातच जाहीर केले. २२ पदवी परीक्षांचे निकाल विक्रमी वेळेत म्हणजे ३० दिवसांच्या आत विद्यापीठाने जाहीर केले आहेत.
परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा; मे महिन्यात निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ राज्यात एकमेव
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यातच जाहीर केले. २२ पदवी परीक्षांचे निकाल विक्रमी वेळेत म्हणजे ३० दिवसांच्या आत विद्यापीठाने जाहीर केले आहेत. यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यात मे महिन्यात महत्त्वाच्या पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे.

जून महिना हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात विद्यार्थी पुढील करियर करण्यासाठी सज्ज असतो. अशा वेळेस त्याला त्याच्या पदवी निकालाची आवश्यकता असते. मुंबई विद्यापीठाने यावर्षी निकालाचे नियोजन करत उन्हाळी सत्राचे निकाल वेळेत जाहीर केले.

मुंबई विद्यापीठातून दरवर्षी १० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. परदेशी उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया चार ते पाच महिने आधीपासूनच सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिन्यात निकालाची आवश्यकता असते. कारण निकालानंतर त्यांना महाविद्यालयातून ट्रान्सस्क्रिप्ट घेऊन वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसमार्फत परदेशातील विद्यापीठात पाठवायचे असते.

३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

उन्हाळी सत्रात पदवीच्या अंतिम सत्र परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले. यात बीकॉम, बीए, बीएससी, बीएमएस, बीए एमएमसी, बीएससी आयटी, बीआर्किटेक्चर या महत्त्वाच्या परीक्षांबरोबर एकूण २२ पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in