Mumbai University: मुंबई विद्यापीठाचा नवा वाद समोर ; उत्तर पत्रिका झेरॉक्स दुकानावर आढळल्याने युवासेना आक्रमक

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गलथान कारभार सुरु असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
Mumbai University: मुंबई विद्यापीठाचा नवा वाद समोर ; उत्तर पत्रिका झेरॉक्स दुकानावर आढळल्याने युवासेना आक्रमक

उत्तर पत्रिका गहाळ, निकालात दिरंगाई, नुकतेच व्हाट्स अ‍ॅप्सवर प्रश्नपत्रिका लिक झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर सापडल्या असल्याचा आरोप युवा सेनेनं केला आहे. याप्रकरणाचा तपास करुन परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणीही युवासेनेकडून करण्यात आली आहे. यापूर्वीदेखील विद्यापीठातील उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचं प्रकरण समोर आलं होते. आता त्यानंतर बाहेरच्या झेरॉक्स सेंटवर उत्तरपत्रिका सापडल्याचा आरोप केला जात आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गलथान कारभार सुरु असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. दुरस्थ व अध्ययन शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर सापडल्या असल्याचा आरोप केला जात आहे. विद्यापीठाचा परीक्षा विभाग अत्यंत गोपनीय समजला जातो. मात्र याच विभागातील उत्तर पत्रिका बाहेर कशा आल्या असा सवाल युवासेनेकडून केला जात आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात फक्त प्राध्यापक जाऊ शकतात. त्या गोपनीय विभागात शिपाई जाऊन उत्तर पत्रिका बाहेरच घेऊन कशा येतात? असा सवाल युवा सेनेकडून विचारला जात आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. उत्तरपत्रिका अशाप्रकारे बाहेर आल्याने उत्तरपत्रिकेसोबत छेडछाड होऊ शकते. किंवा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in