Mumbai : पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे.
Mumbai : पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Published on

मुंबई : सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेली ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १३ मे पासून होत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.

विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग १ जुलै २०२५ पासून सुरु करण्यात येणार असून सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

-ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करणे, १३ मे ते ३ जून २०२५

-विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी, ९ जून (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)

- तात्पुरती गुणवत्ता यादी, १० जून (संध्याकाळी ६ वाजता)

-विद्यार्थी तक्रार, १२ जूनपर्यंत (दुपारी १ वाजेपर्यंत)

-पहिली गुणवत्ता यादी, १७ जून (संध्याकाळी ६ वाजता)

-ऑनलाईन शुल्क भरणे, १८ जून ते २१ जून २०२५ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

-द्वितीय गुणवत्ता यादी, २४ जून (संध्याकाळी ६ वाजता)

- ऑनलाईन शुल्क भरणे, २५ जून ते २७ जून (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

-कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स, १ जुलै २०२५

logo
marathi.freepressjournal.in