राजकीय पक्षांबद्दल बोलणे प्राध्यापकांना भोवणार? सोशल मीडियावरील व्हिडिओ महागात पडणार?

मुंबई विद्यापीठाच्या सेवेत असतानाही काही प्राध्यापक राजकीय पक्षांबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत असल्याचा मुद्दा मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
राजकीय पक्षांबद्दल बोलणे प्राध्यापकांना भोवणार? सोशल मीडियावरील व्हिडिओ महागात पडणार?
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सेवेत असतानाही काही प्राध्यापक राजकीय पक्षांबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत असल्याचा मुद्दा शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. यावर कायदेशीर मत जाणून घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सभेत दिले. त्यामुळे राजकीय पक्षांबद्दल व्हिडिओ बनवणे प्राध्यापकांना भोवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नोकरीत असलेले काही प्राध्यापक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत असतात. या व्हिडीओना आता अधिसभा सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. नोकरीत असताना राजकीय पक्षांवर भाष्य करणे नियमात बसते का? असा प्रश्न एका सदस्याने उपस्थित केला. याच चर्चेवेळी मुंबई विद्यापीठाच्या मुख्य पदावरील व्यक्ती आणि विद्यापीठाची बदनामी करणारे व्हिडीओ काही लोक व्हायरल करत आहेत.

विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी काही सदस्यांनी लावून धरली. त्यावर प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

logo
marathi.freepressjournal.in