
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्झिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करायची आहे.
बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाऊंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (काॅम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनॅलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ.वाय.बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी (बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :
अर्ज विक्री (संबंधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन)
– ८ ते २३ मे (दुपारी १ पर्यंत)
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर)
– ८ ते २३ मे (दुपारी १ पर्यंत)
ऑनलाइन ॲडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – ८ ते २३ मे (१ पर्यंत)
(प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस ॲडमिशन आणि अल्पसंख्यांक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल
पहिली मेरीट लिस्ट - २७ मे (सकाळी ११ वाजता)
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह)
२८ ते ३० मे (दुपारी ३ पर्यंत)
द्वितीय मेरीट लिस्ट - ३१ मे (संध्याकाळी ७.०० वाजता)
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे
२ ते ४ जून (दुपारी ३ पर्यंत)
तृतीय मेरीट लिस्ट - ५ जून (सकाळी ११ वाजता)
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे
६ ते १० जून (दुपारी ३ पर्यंत)
कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन - १३ जून