‘डाटा ॲॅनेलिटिक्स’ विषयाची दुहेरी पदवी मिळणार; मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाशी करार

डाटा ॲॅनालिस्ट अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी शिक्षणासाठी सेंट लुईस विद्यापीठात जाता येईल. तेथे त्यांना इंटर्नशीप व नोकरीचे प्रशिक्षण मिळू शकेल. विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळू शकेल. पीएचडी विद्यार्थ्यांना फेलोशीपही सुरू केली जाणार आहे.
‘डाटा ॲॅनेलिटिक्स’ विषयाची दुहेरी पदवी मिळणार; मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाशी करार

मुंबई : मुंबई विद्यापीठ व अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘डाटा ॲॅनेलिटिक्स’ विषयाची दुहेरी पदवी देणार आहे. मुंबई विद्यापीठाने परदेशी विद्यापीठाशी करार करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मुंबई विद्यापीठाने फ्रान्सच्या ट्रोयस तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार केला होता. या अंतर्गत ‘नॅनोसायन्स’ व ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

डाटा ॲॅनालिस्ट अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी शिक्षणासाठी सेंट लुईस विद्यापीठात जाता येईल. तेथे त्यांना इंटर्नशीप व नोकरीचे प्रशिक्षण मिळू शकेल. विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळू शकेल. पीएचडी विद्यार्थ्यांना फेलोशीपही सुरू केली जाणार आहे.

देशातील विद्यापीठांनी परदेशी विद्यापीठांसोबत करार करावेत, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पतमान संस्थांकडून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचे मूल्यांकनही होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, दुहेरी पदवी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक लवचिकपणे अभ्यासक्रम शिकता येऊ शकेल.

या करारानुसार, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्यास मदत मिळेल. विशेषत: आयटी क्षेत्रात भारत व अमेरिकेत व्यापक विस्ताराच्या संधी मिळतील. तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील.

- रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठ कुलगुरू

दोन्ही विद्यापीठातील सुविधा व संसाधने वापरण्याची विद्यार्थ्यांना संधी

पदव्युत्तर पदवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने परदेशी विद्यापीठांसोबत करार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दिवाळीत विद्यापीठाने विविध देशांच्या राजदूतांसोबत चर्चा केली होती. मुंबई विद्यापीठाने परदेशी विद्यापीठाशी करार करण्याची ही दुसरी वेळ आहे. अमेरिकेचे शहरातील वाणिज्यदूताच्या कार्यालयात दोन विद्यापीठांनी करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञान, डाटा ॲॅनालिस्ट, मशीन लर्निंग, डाटा मायनिंग, डीप लर्निंग, डाटा इथिक्स प्रायव्हसी आदींचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल. दोन्ही विद्यापीठातील सुविधा व संसाधने वापरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in