खिडकी फोडली, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि पळून गेला; विक्रोळीत धक्कादायक घटना

मुंबईतील विक्रोळी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर खिडकीतून घरात शिरून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी ३० मे रोजी घडली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून ३१ वर्षीय समीर शेख या आरोपीला अटक केली आहे.
खिडकी फोडली, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि पळून गेला; विक्रोळीत धक्कादायक घटना
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

मुंबईतील विक्रोळी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर खिडकीतून घरात शिरून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी ३० मे रोजी घडली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून ३१ वर्षीय समीर शेख या आरोपीला अटक केली आहे. ही अटक तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात आली असून, आरोपीविरोधात पोस्को कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर शेख याने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलीच्या घरात कोणीही नसताना खिडकी फोडून आत प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर घटनास्थळावरून पलायन केले. मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी त्वरित तपासाला सुरुवात करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर शुक्रवारी आरोपी समीर शेखला अटक करण्यात आली.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही तपासणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in