मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीची निवडणूक रंगतदार झाली. एफ-दक्षिण व एफ-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी गैरहजर राहत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी सातमकर यांनी माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव केला.
मुंबई महानगरपालिकेच्या १७ पैकी सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली.
विजयी उमेदवार
उत्तर व आर मध्य - प्रकाश दरेकर
आर दक्षिण - लीना देहरकर
सीडी - आकाश पुरोहित
एफ उत्तर व एफ दक्षिण - मानसी सातमकर
एबीई - ज्ञानराज निकम
पी पूर्व व पी पश्चिम - हैदरअली अस्लम शेख