मुंबईत २८ मे रोजी १५ टक्के पाणीकपात; ठाणे-भिवंडीलाही बसणार फटका

मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील...
मुंबईत २८ मे रोजी १५ टक्के पाणीकपात; ठाणे-भिवंडीलाही बसणार फटका
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम पालिकेच्या वतीने हाती घेतले जाणार आहे.

हे काम बुधवार, २८ मे रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांसदेखील ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in