मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील ३०० मिलिमीटर, ६०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील ३०० मिलिमीटर, ६०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत पालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील म्हणजेच कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंग्यातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

जुनी आणि नवीन तानसा जलवाहिनी तसेच विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील एकूण पाच झडपा (चार बटरफ्लाय झडप आणि १ स्लुईस झडप) बदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार असून ते शनिवारी सकाळपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांतील एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर या चार प्रशासकीय विभागात काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

प्रभावित विभागांचा तपशील पुढीलप्रमाणे -

एन विभाग : राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओएनजीसी वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर. एन. गांधी मार्ग.

एल विभाग : न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर.

एम पश्चिम विभाग : टिळक नगर, टिळक नगर स्थानक रस्ता, पेस्टम सागर रस्ता क्रमांक १ ते ६, ठक्कर बाप्पा वसाहत पाडा क्रमांक १ ते ४, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस. जी. बर्वे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम बाजूकडील सेवा मार्ग (प्रगती सोसायटी), गोदरेज वसाहत, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत, एम. एम. आर. डी. ए. एस. आर. ए. वसाहत.

एफ उत्तर विभाग : शीव (सायन) पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाउंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा विल्डिंग्ज (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगरचा काही भाग, गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, भीमवाडी येथील प्रवेशद्वार क्रमांक ४ आणि ५.

logo
marathi.freepressjournal.in