मुंबईत काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शिवडीत 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसवण्याचे काम हाती घेणार

शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ-दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

मुंबई : शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ-दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे.

हे काम गुरुवार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, १७ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

तरी संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, या कामामुळे मुंबई शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार असून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद

'ए' विभाग

पी. डिमेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी १.४० ते ४.०० वा. आणि रात्री ९.४० ते मध्यरात्री २.०० वा.) (गुरुवार, १६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

'बी' विभाग

उमरखाडी, नूरबाँ चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नांजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक रोड नवरोजी हिल, टंडेल (उ), निशाणपाडा स्ट्रीट (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री ८.३० ते १०.०० वा.) (गुरुवार, १६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

'ई' विभाग

नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुसा किल्लेदार रस्ता, सोफिया जुबेर मार्ग, डिमटिमकार मार्ग, एम. ए. मार्ग, टँकपाखाडी मार्ग, क्लिअर रोड, बी. जे. मार्ग, के. के. रोड (पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ५.०० ते सकाळी ६.३० वा.) (शुक्रवार, १७ एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा).

logo
marathi.freepressjournal.in