Mumbai : तानसा जलवाहिनी फुटली; दुरुस्‍तीचे काम युद्धपातळीवर, 'या' भागांत पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहिला. शनिवाराही हीच स्थिती कायम राहणार आहे.
Mumbai : तानसा जलवाहिनी फुटली; दुरुस्‍तीचे काम युद्धपातळीवर, 'या' भागांत पाणीपुरवठा बंद
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीला पवई येथे शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठी गळती लागल्याने काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

गळती पूर्णपणे थांबवून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. असे असले तरी दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी पाहता एच-पूर्व, के- पूर्व, जी-उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. शुक्रवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहिला. शनिवाराही हीच स्थिती कायम राहणार आहे.

पवई येथे आरे वसाहतीजवळच्या गौतम नगर परिसरात १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीवर मोठी गळती लागल्याचे आढळून आले. त्याची माहिती मिळताच, सहाय्यक अभियंता नगर बाह्य (प्रमुख जलवाहिन्या) विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी तत्काळ तेथे जाऊन जलवाहिनीवरील झडप (व्हॉल्व्ह) बंद करून पाणी गळती बंद केली. तानसा (पश्चिम) जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्ती कामदेखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील सुमारे २४ तास हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. आकस्मिकरीत्या उद्भवलेल्या या गळतीमुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

येथील पाणीपुरवठा बंद राहील

- के पूर्व विभाग : प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी १/२, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत , मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

-सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

-मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.३० ते सकाळी ९.३०) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

-मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी २.००) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

-ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी ८.१५) येथील (पाणीपुरवठा बंद राहील.

- एच पूर्व विभाग : वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ २४ तास) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

-जी उत्तर विभाग : धारावी (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते दुपारी १२.०० आणि दुपारी ४.०० ते रात्री ९.००) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

येथे कमी दाबाने पाणीपुरवठा

- एस विभाग : गौतम नगर, जयभीम नगर (२४ तास पुरवठा) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

- फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ (सकाळी ७.०० ते सकाळी ११.००) येथील पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

- पठाणवाडी, महात्मा फुले नगर (२४ तास पाणीपुरवठा) येथील पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

- कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतचा परिसर (२४ तास पाणीपुरवठा) येथील पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

logo
marathi.freepressjournal.in