धरणांची पातळी खालावली; मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता, सातही धरणांमध्ये उरला फक्त...
संग्रहित छायाचित्र

धरणांची पातळी खालावली; मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता, सातही धरणांमध्ये उरला फक्त...

कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

मार्चच्या सुरुवातीला उन्हाने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात देखील होत आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणाची क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.

धरणांतील पाणीसाठा किती?

logo
marathi.freepressjournal.in