मुंबईच्या तापमानात सध्या फारच चढ-उतार सुरु आहेत. मुंबईत कमाल तापमानात घट झाल्याने मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा जाणवायला सुरवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची आता उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली आहे. मुंबईतील कमाल तापमान ३० अंशापर्यंत खाली घसरलं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तापदायक ठरलेली उष्णता आता खूपच कमी झाली आहे. तर किमान तापमानही २२ अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये रात्री थंडी वाजते, तर दिवसादेखील मुंबईकरांची उकाड्यातून सुटका झाली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या २४ तासांत आकाश ढगाळ राहणार असून कमान आणि किमान तापमानात घट होऊन ते अनुक्रमे २८ आणि २० अंशापर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गारव्यामुळे हवेतील आर्द्रता ही ५० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
मुंबईमध्ये आता मुंबईकरांची प्रदूषणातूनही सुटका झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता मुंबईकरांची यातून सुटका झाली आहे. मुंबईमध्ये आज हवेचा स्तर समाधानकारक असल्याचं दिसलं आहे. आज मुंबईत ९४ एक्यूआयची नोंद झाली. वरळी ५३, भांडुप ७७, अंधेरी ८१, मालाड ८३, बोरिवली १०० एक्यूआयची नोंद झाली आहे. कुलाबा १०१, माझगाव ११०, चेंबूर ११०, बीकेसी १४० एक्यूआयसह हवेचा स्तर मध्यम नोंदवण्यात आला आहे.