Mumbai Rains: शहर आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, रेल्वे सेवा प्रभावित, शाळा कॉलेजला सुट्टी; जाणून घ्या अपडेट्स

Mumbai Weather Update: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सोशल मीडियाद्वारे अपडेट दिले आहे की मुंबईत सकाळी १ ते सकाळी ७ या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले, त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
Mumbai Rains: शहर आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, रेल्वे सेवा प्रभावित, शाळा कॉलेजला सुट्टी; जाणून घ्या अपडेट्स

Mumbai rains LIVE Updates: मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. लांबलचक ट्रॅफिक जाम आणि लोकल ट्रेन सेवांमध्ये व्यत्यय यांसह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रात्रभर मुसळधार सरींनी सुरू झालेला पाऊस आठवडाभर सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) ८ जुलै रोजी मुंबईत दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाने शेअर केले अपडेट्स

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सोशल मीडियाद्वारे अपडेट दिले आहे की मुंबईत सकाळी १ ते सकाळी ७ या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले, त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दिवसभर मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता असल्याने, बीएमसीने मुंबई परिसरातील सर्व बीएमसी, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली. "आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल," असे बीएमसीने सांगितले आहे.

रेल्वेचे अपडेट्स

मध्य रेल्वेच्या सकाळी ६.३० वाजताच्या अपडेटनुसार, मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा सुरू आहेत. तथापि, भांडुप आणि नाहूर दरम्यान मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे, पॉइंट्स क्लॅम्पिंग आणि पॅडलॉक करून गाड्या चालवल्या जात आहेत. क्लॅम्पिंग पूर्ण झाले आहे. सध्या हार्बर लाईन वरील ट्रेन १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

पश्चिम रेल्वेने एका अपडेटमध्ये माहिती देखील शेअर केली आहे, "मुसळधार पाऊस असूनही, मुंबईकरांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागातील मुंबई लोकल सामान्यपणे धावत आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेच्या जलपंपांचा वापर केला जात आहे, आणि रेल्वे कर्मचारी मुंबईची लाईफलाईन सुरळीत चालू ठेवण्यासाठी विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”

पावसामुळे पाणी साचल्याने अनेक बेस्ट बस त्यांच्या नियमित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्याचे बेस्ट बस परिवहनने सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in