
मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. तसेच अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.