Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर बंद पडल्यानंतर प्रवासी त्यावरून चालत जातात. कारण एकदा एस्केलेटर बंद पडल्यानंतर सध्या २५ मिनिटांनी सुरू होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. आता रेल्वेने एस्केलेटरसाठी नवीन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे बंद पडलेला एस्केलेटर अवघ्या २ मिनिटांत सुरू होणार आहे.
Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी
Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर बंद पडल्यानंतर प्रवासी त्यावरून चालत जातात. कारण एकदा एस्केलेटर बंद पडल्यानंतर सध्या २५ मिनिटांनी सुरू होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. आता रेल्वेने एस्केलेटरसाठी नवीन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे बंद पडलेला एस्केलेटर अवघ्या २ मिनिटांत सुरू होणार आहे.

बंद असलेले एस्केलेटर अनेक रेल्वे स्थानकात दिसत असतात. ते कधी सुरू होणार हे प्रवाशांना माहिती नसते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि एस्केलेटर बंद राहण्याचा कालावधी कमी करण्यासाठी ही नवीन व्यवस्था लागू केली जात आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आपत्कालीन ‘स्टॉप’ बटण दाबून एस्केलेटर थांबल्यास ते पुन्हा सुरू होण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा वेळ लागतो. ‘भारतीय मानक ब्यूरो’द्वारे मंजूर केलेल्या मानकांवर आधारित ही नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर प्रवाशांचा वाट पाहण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल.

मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर एस्केलेटर ही अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि जड सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरते. एस्केलेटर दीर्घकाळ बंद राहिल्यास प्रवाशांना जिने वापरावे लागतात, ज्यामुळे गर्दीच्या स्थानकांवर त्रास आणि खोळंबा वाढतो. ही समस्या सोडवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने नवीन खरेदी केलेल्या एस्केलेटरसाठी वॉरंटी कालावधी संपल्यानंतर उत्पादकांकडून किमान १५ वर्षांची सर्वसमावेशक देखभाल अनिवार्य केली आहे. संशोधन डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) १६ जानेवारी रोजी जारी केलेल्या सुधारित तांत्रिक मानकांनुसार, १३ ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाने या संदर्भातील सूचना जारी केल्या आहेत.

ज्या जुन्या एस्केलेटरची देखभाल त्यांच्या उत्पादकांकडून केली जात नाही, त्यांच्यासाठी रेल्वे एकवेळ दुरुस्ती करू शकते आणि त्यानंतर किमान सात वर्षांसाठी उत्पादकाकडून सर्वसमावेशक देखभाल करून घेतली जाईल. एस्केलेटरच्या देखभालीवर लक्ष ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आधीच एक विशेष पोर्टल विकसित केले आहे. आता ही प्रणाली संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये लागू केली जात आहे. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार, एस्केलेटरची तपासणी आरडीएसओ चेकलिस्टनुसार केली जाणे आवश्यक आहे, ज्यावर उत्पादक आणि रेल्वे प्रतिनिधी या दोघांची संयुक्त स्वाक्षरी असेल.

गर्दीच्या ठिकाणी कर्मचारी तैनात करणार

गरजेनुसार संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्याची तरतूद वार्षिक देखभाल करारात असावी, असे निर्देशही बोर्डाने दिले आहेत. या उपायांचा मुख्य उद्देश वारंवार होणारे बिघाड कमी करणे, जलद दुरुस्ती सुनिश्चित करणे आणि व्यस्त रेल्वे स्थानकांनावरील एस्केलेटरची विश्वासार्हता वाढवणे हा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in