Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि भाईंदर स्थानकादरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गांवर ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात आला आहे. तसेच प्रभादेवी स्थानकावर प्रभादेवी उड्डाणपुलाचा गर्डर उतरवण्याच्या कामासाठी सर्व मार्गांवर ‘मोठा ब्लॉक’ घेण्यात येईल. हे दोन्ही ब्लॉक शनिवारी मध्यरात्री घेण्यात येणार आहेत.
Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक
Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक
Published on

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि भाईंदर स्थानकादरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गांवर ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात आला आहे. तसेच प्रभादेवी स्थानकावर प्रभादेवी उड्डाणपुलाचा गर्डर उतरवण्याच्या कामासाठी सर्व मार्गांवर ‘मोठा ब्लॉक’ घेण्यात येईल. हे दोन्ही ब्लॉक शनिवारी मध्यरात्री घेण्यात येणार आहेत.

बोरिवली आणि भाईंदर दरम्यानचा ब्लॉक रात्री १२.१५ ते मध्यरात्री ३.४५ या वेळेत असेल, तर प्रभादेवी स्थानकावरील मोठा ब्लॉक रात्री १.३० ते सकाळी ६ या वेळेत घेण्यात येईल. बोरिवली- भाईंदर ब्लॉकच्या कालावधीत, सर्व गाड्या विरार ते वसई रोड आणि बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील, तर प्रभादेवी येथील ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील, काही गाड्या दादर आणि वांद्रे येथेच थांबवून तिथूनच परत पाठवल्या जातील. या कालावधीत चर्चगेट आणि प्रभादेवी स्थानकादरम्यान, तसेच माटुंगा रोड आणि माहीम स्थानकांवर गाड्या धावणार नाहीत.

ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ठाणे आणि वाशी व नेरुळ स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला आहे. ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते सायंकाळी ४.१० वाजल्यापर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत वाशी व नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा स्थगित राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ या वेळेत वाशी, नेरूळ, पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या 'डाऊन' मार्गावरील सेवा आणि पनवेल, नेरूळ, वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी १६.०९ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या 'अप' मार्गावरील सेवा रद्द राहतील.

logo
marathi.freepressjournal.in