मुंबईला मिळणार मध्य रेल्वेचं चौथं टर्मिनस ; परळ वर्कशॉपच्या जागी उभारणार नवं टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ८८ लांबपल्ल्याच्या गाड्या जे जा करत असतात. तर १२०० पेक्षा अधिक लोकल ट्रेन ये जा करतात
मुंबईला मिळणार मध्य रेल्वेचं चौथं टर्मिनस ;  परळ वर्कशॉपच्या जागी उभारणार नवं टर्मिनस

सध्या मुंबईत मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या टर्निमनसवरु देशभरातील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. यामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. यामुळे रेल्वे प्रशासनाने आणखी एक टर्मिनस उभारुन या तिन्ही टर्निनस वरचा ताण कमी करायचं ठरवलं आहे. मुंबईतील परळ येथे नवं टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आता मुंबईला चौथं मध्य रेल्वेचं टर्मिनस मिळणार आहे.

सध्या परळमधील या जागेवर रेल्वेचं मोठं वर्कशॉप आहे. आता येथील काही युनीट हे माटुंगा कारशेडमध्ये हलवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ८८ लांबपल्ल्याच्या गाड्या जे जा करत असतात. तर १२०० पेक्षा अधिक लोकल ट्रेन ये जा करतात. त्यामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. तसंच दादर ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचा थेट परिणाम हा रेल्वेच्या वेळापत्रकावर होतो. यामुळे अनेक गाड्या रद्द देखील कराव्या लागतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील भार हलका व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून वर्षभरात या टर्मिनसचं काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. परळ टर्मिनससाठी परळ वर्कशॉपच्या १९ एकर जागेची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पाच प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना करण्यात आली आहे. यात गाड्या उभ्या करण्यासाठी पाच स्टेबलिंग मार्गिका, तर तर त्यांच्या गाड्यांची व्यवस्थित पाहणी तसच तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी पाच पिट लाईनही उभारण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेकडून २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in