'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

एक महिला लोकल ट्रेनच्या दारात उभं राहून शेजारच्या ट्रॅकवरून येणाऱ्या लोकलवर मोठा दगड फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघून अनेक नेटकऱ्यांनी हा प्रकार मुंबईत झाल्याचा दावा करीत संताप व्यक्त केला असून मुंबई पोलिसांना सोशल मीडियावर टॅग करून महिलेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर
Published on

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक महिला धावत्या लोकल ट्रेनच्या दारात उभं राहून शेजारच्या ट्रॅकवरून येणाऱ्या लोकलवर मोठा दगड फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघून अनेक नेटकऱ्यांनी हा प्रकार मुंबईत झाल्याचा दावा करीत संताप व्यक्त केला असून मुंबई पोलिसांना सोशल मीडियावर टॅग करून महिलेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ट्रेन 'मिस' झाल्याचा बदला घेण्यासाठी महिलेने दगडफेक केली अशा मजेशीर कमेंट्सही अनेक नेटकरी करीत आहेत. जाणून घेऊया ही घटना खरंच मुंबईत घडली आहे का आणि सत्य काय?

बघा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल क्लिपमध्ये ती महिला हातात मोठा दगड धरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या केबिनवर फेकताना दिसते. दगडफेकीनंतर ती शिवीगाळ करताना, जोरात ओरडतानाही दिसतेय, मात्र तिचे बोलणे स्पष्ट ऐकू येत नाही. या धक्कादायक प्रकारामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करून कठोर कारवाईची मागणी केली. अगदी मुंबई पोलिसांच्या अधिकृत खात्यानेही सुरुवातीला या व्हायरल पोस्ट्सवर विश्वास ठेवून ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) वर मुंबई सरकारी रेल्वे पोलिसांना (GRP) तपासासाठी टॅग केलं. मात्र लवकरच रेल्वेप्रेमी आणि तथ्य पडताळणी करणाऱ्या खात्यांनी या व्हिडिओतील काही महत्त्वाच्या तपशीलांकडे लक्ष वेधलं.

काय आहे सत्य?

व्हायरल व्हिडिओ नीट बघितल्यास तो मुंबईतील लोकलचा नसल्याचं स्पष्ट होतं. या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे लोकलच्या पुढच्या भागाचे डिझाईन. लोकलचा पुढील भाग, अर्थात मोटरमनचे केबिन नीट बघितल्यास ती मुंबईतील पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वे (CR) विभागातील लोकल गाड्यांसारखा नाही हे समजते. याउलट, त्या लोकलवर “ER” अशी खूण दिसते, जी ईस्टर्न रेल्वेची (पूर्व रेल्वे) असून ही लोकल प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि शेजारच्या राज्यांत धावते. उपलब्ध पुराव्यांवरून हा व्हिडिओ ईस्टर्न रेल्वे नेटवर्कअंतर्गत येणाऱ्या भागातील असल्याचं स्पष्ट होतं. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप घटनेचं नेमकं ठिकाण जाहीर केलेलं नाही, मात्र व्हायरल पोस्टला उत्तर देताना, “हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे, असे उत्तर दिले असून असून ईस्टर्न रेल्वेच्या आरपीएफने हावडा आणि सियालदाह स्थानकांच्या RPF ला टॅग केलं आहे.

'बदला घेण्यासाठी' महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर
'बदला घेण्यासाठी' महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

दरम्यान, महिलेने दगडफेक का केली आणि काही कारवाई झाली की नाही याबाबत अजून माहिती अद्याप मिळालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in