तरुणीची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या; प्रियकर आणि मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

तिचे सुरज आचार्यसोबत प्रेमसंबंध होते, ते दोघेही लग्न करणार होते. याबाबत तिने पालकांनाही सांगितले होते. दरम्यान, तिची करण रावल नावाच्या तरुणाशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली.
तरुणीची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या; प्रियकर आणि मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मानसिक नैराश्यातून दिव्या नावाच्या एका २४ वर्षांच्या तरुणीने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत तरुणीचा प्रियकर सुरज आचार्य आणि मित्र करण रावल या दोघांविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी मित्र करणला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार जोगेश्वरी येथे राहत असून, त्यांची दिव्या ही मुलगी आहे. ती घरातच खासगी शिकवणी घेते. तिचे सुरज आचार्यसोबत प्रेमसंबंध होते, ते दोघेही लग्न करणार होते. याबाबत तिने पालकांनाही सांगितले होते. दरम्यान, तिची करण रावल नावाच्या तरुणाशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. सूरजसोबतचे संबंध तोडावे यासाठी तो दिव्यावर दबाव आणत होता, तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होता. तसेच, जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. तर, करणविषयी समजल्यावर सूरजही तिच्यावर संशय घ्यायला लागला होता. दोघांकडून होणाऱ्या त्रासामुळे ती प्रचंड मानसिक दबावाखाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दिव्याच्या वडिलांचा जबाब नोंदवून सूरज आणि करणविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच सूरजचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in