मुंबईकरांनो काळजी घ्या! १०० जणांमागे १० रुग्ण डायबिटीसने त्रस्त

पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर आली आहे
मुंबईकरांनो काळजी घ्या! १०० जणांमागे १० रुग्ण डायबिटीसने त्रस्त

बदलते राहणीमान सतत धावपळ यामुळे मुंबईकर विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत. त्यात मुंबईत डायबिटीस व तणावग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत १०० जणांमागे प्रत्येकी १० जण डायबिटीसने ग्रस्त आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आता तरी काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नायर, केईएम व सायन ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून २११ आरोग्य केंद्रे, १८९ दवाखाने, २७ प्रसूतीगृहे, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि आरोग्य सेवेंतर्गत ४ मोठी वैद्यकीय महाविद्यालये, ५ रुग्णालये आणि १ दंत महाविद्यालय आहे. या ठिकाणी दर्जेदार आणि मोफत उपचार मिळत असल्यामुळे मुंबई तसेच राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब रुग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही मोठी असते. या पार्श्वभूमीवर २ ऑगस्टपासून पाच मेडिकल कॉलेज, सहा उपनगरीय रुग्णालये आणि चार विशेष रुग्णालयांमध्ये डायबेटिस, हायपरटेन्शन चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in