मुंबईकरांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'चांद्रयान - ३' लँडिंगचा क्षण ; लोकलमध्ये गायलं राष्ट्रगीत

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारताचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे
मुंबईकरांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'चांद्रयान - ३' लँडिंगचा क्षण ; लोकलमध्ये गायलं राष्ट्रगीत

चांद्रयान -३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. प्रत्येक भारतीयाने हा क्षण एखाद्या सणाप्रामाणे साजरा केला आहे. भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारताचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

इस्त्रोला मिळालेल्या या यशाबाबत प्रत्येक भारतीयाने सोशळ मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. अशात मुबंईच्या अंधेरीतील नागरिकांनी मात्र अनोख्या पद्धतीने हा क्षण साजरी केला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबईकरांनी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये राष्ट्रगीत गाऊन हा आपला आनंद साजरा केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. याच सोबत काल मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी भारत माता की जय अशा घोषणा देत जल्लोष जासरा केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत रेल्वे स्थानकारव प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. यात चंद्रयान चंद्रावर लँड झाल्यानंतर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in