मुंबईकरांना मिळणार व्यवहाराचे मेसेज ;पालिका सहा कोटी रुपये खर्चणार

वर्षाला १७ कोटी २३ लाख एसएमएसची सेवा अंदाजित असून तीन वर्षांसाठी ५१ कोटी ७० लाख एसएमएस करता ५ कोटी ७९ लाख ६१ हजार रुपये खर्च केले जाणार आहे.
मुंबईकरांना मिळणार व्यवहाराचे मेसेज ;पालिका सहा कोटी रुपये खर्चणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येतात. या सुविधांची माहिती मुंबईकरांना मिळावी यासाठी एसएमएस सेवा उपलब्ध करण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल ६ कोटी रुपये खर्चणार आहे. दरम्यान, ही एसएमएस सेवा देण्यासाठी पालिकेने प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई महापालिकेच्या आतापर्यंत मुख्य खात्यामार्फत विकास नियोजन विभागासाठी एमसीजीएम सेवा डीपी, आरोग्य विभागासाठी एमसीजीएम सेवा हेल्थ, माहिती तंत्रज्ञान विभागासाठी एमसीजीएम सेवा मीट उद्यान विभागासाठी एमसीजीएम सेवा, स्विमिंग पूल, अग्निशमन विभागासाठी एमसीजीएम सेवा, एम एफबी, इमारत व कारखाने खाते विभागासाठी एमसीजीएम सेवा इस्टेट, मानव संसाधन विभागासाठी एमसीजीएम सेवा एचआर, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी एमसीजीएम सेवा एसडब्लूएम, कर निर्धारण आणि संकलन एमसीजीएम सेवा सीव्हीसी आदी एसएमएस सेवा देण्यासाठी इत्यादी उपखाती तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे हे एसएमएस पाठवले जातात. तसेच एसएमएस मुख्य खात्यामार्फत इतर विभागाच्या आवश्यकतेनुसार एसएमएस सेवा सुरू करण्यासाठी संबंधित विभागासाठी उपखाते तयार करण्यात येत आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार महानगरपालिकेत विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ई-गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये नवीन तंत्रज्ञान व नव कल्पना यांचा वापर करून कामकाजात वापर सुलभता आणि पारदर्शकतेसाठी पालिकेने आयटी व्हिजन २०२५ जाहीर केले आहे.

वर्षांला १७ कोटी मेसेज पाठवण्याचे लक्ष!

वर्षाला १७ कोटी २३ लाख एसएमएसची सेवा अंदाजित असून तीन वर्षांसाठी ५१ कोटी ७० लाख एसएमएस करता ५ कोटी ७९ लाख ६१ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रती एसएमएस करता ९५ पैसे रुपये आकारले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in