मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते मिळणार, मे २०२३पर्यंत नवीन रस्ते मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित दोन हजार किलोमीटरचे रस्ते असून डांबराचे रस्ते दरवर्षी पावसाळ्यात उखडतात
मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते मिळणार, मे २०२३पर्यंत नवीन रस्ते मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते मिळावे, यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ऑक्टोबर नंतर २१८ नवीन रस्तेकामांना सुरुवात करण्यात येणार असून, मे २०२३पर्यंत नवीन रस्ते मुंबईकरांच्या सेवेत असतील, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मुंबईतील ४२३ रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित दोन हजार किलोमीटरचे रस्ते असून डांबराचे रस्ते दरवर्षी पावसाळ्यात उखडतात. त्यामुळे वाहनांचा विशेष करून दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यावर भर दिला जात आहे. मुंबईकरांना आतापर्यंत १२८ मजबूत व टिकाऊ रस्ते दिले आहेत, तर शहर व दोन्ही उपनगरांत मिळून आणखी २१८ सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे ऑक्टोबर नंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मे २०२३ पर्यंत मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते मिळतील, असा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in