Mumbai : सिंगापूरच्या धर्तीवर मलबार हिलमध्ये 'ट्री टॉप वॉक'

Mumbai : सिंगापूरच्या धर्तीवर मलबार हिलमध्ये 'ट्री टॉप वॉक'
Published on
चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, दक्षिण मुंबईतील मलबार हिल्स येथे मुंबईमधील पहिला उंच निसर्ग मार्ग (Elevated Nature Trail) हा रविवारी, ३० मार्चपासून सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी अगदी सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या ‘ट्री टॉप वॉक’चा अनुभव घेता येणार आहे.
चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, दक्षिण मुंबईतील मलबार हिल्स येथे मुंबईमधील पहिला उंच निसर्ग मार्ग (Elevated Nature Trail) हा रविवारी, ३० मार्चपासून सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी अगदी सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या ‘ट्री टॉप वॉक’चा अनुभव घेता येणार आहे. फोटो : सलमान अन्सारी
मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या ‘ट्री टॉप वॉक’ला अधिकाधिक मुंबईकरांनी भेट देत निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद लुटा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या ‘ट्री टॉप वॉक’ला अधिकाधिक मुंबईकरांनी भेट देत निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद लुटा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. फोटो : देवश्री भुजबळ
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रणविषयी जनजागृतीसाठी ‘ट्री टॉप वॉक’ अर्थात निसर्ग उन्नत मार्ग आदर्श ठरणार आहे. मलबार हिल परिसरात निर्मित निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण लोढा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रणविषयी जनजागृतीसाठी ‘ट्री टॉप वॉक’ अर्थात निसर्ग उन्नत मार्ग आदर्श ठरणार आहे. मलबार हिल परिसरात निर्मित निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण लोढा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. फोटो : सलमान अन्सारी
निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.
निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.फोटो : सलमान अन्सारी
मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे याठिकाणी परीरक्षणाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे.
मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे याठिकाणी परीरक्षणाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. फोटो : सलमान अन्सारी
झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. ३० मार्चपासून हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. येथे एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. ३० मार्चपासून हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. येथे एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.फोटो : सलमान अन्सारी
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पती येथे आहेत. तसेच निरनिराळे पक्षी व सरपटणारे प्राणी देखील पर्यटकांना पाहता येणार आहेत.  तसेच या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन होणार आहे.
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पती येथे आहेत. तसेच निरनिराळे पक्षी व सरपटणारे प्राणी देखील पर्यटकांना पाहता येणार आहेत. तसेच या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन होणार आहे.फोटो : सलमान अन्सारी
घरबसल्या ऑनलाइन तिकीट नोंदणी : 
निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrai.mcg. gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तसेच परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन तिकीट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश आणि निर्गमनासाठी पर्याय देण्यात आला आहे.
घरबसल्या ऑनलाइन तिकीट नोंदणी : निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrai.mcg. gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तसेच परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन तिकीट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश आणि निर्गमनासाठी पर्याय देण्यात आला आहे. फोटो : देवश्री भुजबळ
एक्सेस कंट्रोल सिस्टिम :
हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
एक्सेस कंट्रोल सिस्टिम : हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.फोटो : देवश्री भुजबळ
logo
marathi.freepressjournal.in