मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रोखठोक वक्तव्य

फडणवीस यांनी जाहीर केले की, ‘मुंबईचा आगामी महापौर हा हिंदू होईल आणि तो मराठीच असेल’. त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या प्रचाराला आता ‘मराठी आणि हिंदुत्वा’चा धारदार पैलू मिळाला आहे.
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रोखठोक वक्तव्य
छायाचित्र सौजन्य - FPJ (संग्रहित)
Published on

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबईचा पुढचा महापौर कोण असणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी जाहीर केले की, ‘मुंबईचा आगामी महापौर हा हिंदू होईल आणि तो मराठीच असेल’. त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या प्रचाराला आता ‘मराठी आणि हिंदुत्वा’चा धारदार पैलू मिळाला आहे.

मुंबईच्या महापौरपदाबाबत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या विधानाचा धागा पकडून विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले की, ‘एक तर कृपाशंकर सिंह कुठे म्हणाले? ते मीरा-भाईंदरमध्ये म्हणाले, मुंबईत नाही म्हणाले. दुसरे म्हणजे, कृपाशंकर सिंह हे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? आता यांच्याकडे (विरोधकांकडे) कोणी काहीही बोलतं... तुम्ही मीरा-भाईंदरचं काढलं आणि मुंबईत दाखवलं. तुम्ही फार हुशार लोक आहात’.

‘मराठी-हिंदू’ अस्मितेचा पुनरुच्चार

फडणवीस पुढे ठामपणे म्हणाले, ‘म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, ‘मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी असेल’. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे महापौराच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेबाबत असलेली सर्व संदिग्धता आता संपुष्टात आली असून, मुंबईत ‘मराठी आणि हिंदू’ अस्मितेवरच महायुतीचा महापौर बसणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in