मुंबईच्या सात धरणांत पुढील तीन महिने पुरेल इतका जलसाठा उपलब्ध

पाणीकपातीपासुन मुंबईकरांनची सुटका
मुंबईच्या सात धरणांत पुढील तीन महिने पुरेल इतका जलसाठा उपलब्ध

एकीकडे महाराष्ट्रातील पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असताना मुंबईकरांना मात्र याद्वारे मुक्तता मिळणार आहे. मुंबईच्या सात धरणांत पुढील तीन महिने पुरेल इतका जलसाठा असल्याने मुंबईकरांवर पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या कपातीला सामोरे जावे लागणार नाही. सोमवार, ९ मेपर्यंत घेतलेल्या आढाव्यानुसार मुंबईतील धरणांमध्ये ३, ६३, ७८३ दक्षलक्ष लिटर म्हणजेच २५.१३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

उकाड्यापासून हैराण झालेला मुंबईकर वरुणराजा कधी बरसणार याची चातकासारखी वाट पाहत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाणीप्रश्न पेटला आहे. मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख, ४७ हजार, ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा वरुणराजाचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात पाऊस दमदार हजेरी लावेल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

भातसा धरणाजवळ विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना १५ टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. तूर्तास विद्युत केंद्रातील बिघाड दुरुस्त करण्यात आला असला, तरी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे. त्याशिवाय मुंबईच्या सात धरणांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in