यंदा मुंबईत मान्सून १४ दिवस उशिराने झाला. उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत होता. आता पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यामुळे मुंबईच्या कामांची एकप्रकारे पोलखोलच झाली. अनेक ठिकाणी तर पावसाच्या पाण्यामुळे तळे साचल्याचं पाहायला मिळालं. या सर्वांचा परिणाम मुंबईच्या वाहतूकीवर झाला. मुंबईत पाणी साचल्याच्या बातम्या माध्यमांत झळकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत अनेक भागांची पाहणी केली. यावेळी शिंदे यांच्याकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सुचना देखील करण्यात आल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पाहणी साचलेल्या ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली आहे. त्यांनी वरळी येथील कोस्टल रोड येथे भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. पाणी साचण्याच्या कारणांची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसंच त्यांनी माटुंगा येथेही पाहणी केली. मिलन सबवेलाही भेट दिली. त्यांनंतर शिंदे यांनी पालिकेच्या संबंधित विभागांचा आढावा घेतला. यावेली मुख्यमंत्र्यांनी पाणी उपसा करणारी यंत्रणा सक्रिय करुन जास्तीत जास्त पाणी कमी वेळेत कसं उपसा होईल, याकडे लक्ष देण्याचा सुचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या.
मुंबईत पावसाचा जोर वाढला असल्याने सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाने जरा विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होता. मात्र पाऊस संततधार राहिल्यास पाणी साचण्याचा वेग वाढून वाहतूक ठप्प होते. पहिल्याच पावसात मुंबईचती तुंबई झाल्याने सर्वत्र पाणी साचले होते.