मुंबईचे पाणी दूषित! सर्वाधिक गढूळ पाणी दादर, माटुंगा, डोंगरीत

पालिकेच्या वार्षिक पर्यावरण रिपोर्टमधून उघडकीस
मुंबईचे पाणी दूषित! सर्वाधिक गढूळ पाणी दादर, माटुंगा, डोंगरीत

मुंबई : स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा मुंबईला होतो, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र मुंबईचे पाणी दूषित असल्याचे पालिकेच्या वार्षिक पर्यावरण रिपोर्टमधून उघडकीस स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा मुंबईला होतो, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र मुंबईचे पाणी दूषित असल्याचे पालिकेच्या वार्षिक पर्यावरण रिपोर्ट मधून उघडकीस आले आहे. बी वॉर्डातील उमर खाडी, डोंगरी, दादर माटुंगा धारावीत सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी भांडुप येथील पाण्यावर ट्रीटमेंट केली जाते. तसेच मुंबईला दररोज करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. तरीही गोळा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यात कोला बॅक्टेरिया आढळतात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी दूषित असल्याचे रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. २०२० - २१ मध्ये जलाशयातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता, ०.३ टक्के कोला बॅक्टेरिया आढळले होते. तर २०२१ मध्ये यात घट झाली. परंतु २०२२ - २३ मध्ये दूषित पाणी असल्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि ०.३ टक्के पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.

'या' भागात सर्वाधिक दूषित पाणी

उमर खाडी, डोंगरी, दादर, माटुंगा, धारावी, खार, वांद्रे, सांताक्रुझ, बोरिवली या भागात पाणीपुरवठ्यात दूषित पाणी आढळले आहे. बी वॉर्ड उमर खाडी डोंगरी - ६.७ टक्के, बोरिवली - २.१ टक्के, दादर, माटुंगा, धारावी - १.७ टक्के तर खार, वांद्रे व सांताक्रुझ - १.६ टक्के पाणी दूषित आढळल्याने ते पाण्यासाठी अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

रोज २०० हून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी!

मुंबईला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता रहावी यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डातून दररोज २०० पाण्याचे नमुने घेण्यात येतात. पालिकेच्या आरोग्य विभाग व जल विभागाकडून पाण्याचे नमुने गोळा केले जातात. गोळा करण्यात येणारे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पालिकेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in