मुंब्रा बनतेय धर्मांतराचे केंद्र ; ४०० जणांच्या धर्मांतराची गाझियाबादमधून अटक आरोपीची कबुली

ही एक मोठी टोळी असून, ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना रमवले जाते
मुंब्रा बनतेय धर्मांतराचे केंद्र ; ४०० जणांच्या धर्मांतराची गाझियाबादमधून अटक आरोपीची कबुली

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतरणाच्या प्रकरणातील मुख्य आरोपीची चौकशी करताना ठाण्यातील मुंब्य्रात तब्बल ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याची जबानी आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ऑनलाईन गेमिंगचा वापर करून ब्रेनवॉशच्या माध्यमातून धर्मांतर केले जात असल्याचे समोर आलेय, अशी माहिती डीसीपी अग्रवाल यांनी दिली आहे. यामुळे मुंब्रा धर्मांतराचे केंद्र आहे की काय, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

गाझियाबादमधल्या धर्मांतराचे धागेदोरे पार ठाण्यातील मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील शाहनवाज मकसूद खान हा आरोपी ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याची माहिती उघड झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी शाहनवाज खान ३१ मे पासूनच फरार आहे. त्याआधी त्याने त्याच्या कुटुंबीयांचे सोलापूरला पलायन केले होते, तर १ जूनला गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क करून त्यांची मदत मागितली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. केरला स्टोरीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांचे धर्मांतर कसे केले जाते, हे दाखवले आहे. पण, धर्मांतराच्या याच पॅटर्नमध्ये बदल करून मोबाईल गेम खेळणाऱ्यांना आता टार्गेट केले जात आहे. त्यात एकट्या मुंब्र्यातून ४०० जणांचे धर्मांतर झाले असेल, तर नक्कीच केरळ स्टोरीवर विश्वास ठेवावा लागणार आहे.

दिल्लीच्या गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतरण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुस्लीम मुले गैर-मुस्लीम नावाने प्रोफाईल बनवून गेम खेळतात. ही टोळी गेम खेळणाऱ्यांना गेममध्ये हरल्यानंतर त्यांना कुराण पठण करायला लावतात. जी मुले कुराण वाचतात त्यांना धर्मांतर करणाऱ्या टोळीतील सदस्य प्रोत्साहन देण्यासाठी खेळात हरवतात. टोळीतील सदस्य हिंदू आयडी तयार करून कुराणात रस दाखवणाऱ्यांशी गप्पा मारतात आणि त्यांचा ब्रेनवॉश करतात. इस्लामकडे कल दाखवणाऱ्या मुलांना झाकीर नाईकचे विषारी व्हिडीओ दाखवतात आणि इस्लामिक साहित्य पुरवून मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना पैशाचे आमिष दाखवून संधी साधत त्यांचे धर्मांतरण करतात.

मोबाईल गेमची भुरळ

मोबाईल गेमच्या बहाण्याने कोवळ्या मुलांना आकर्षित करून धर्मांतर करण्याचा प्रकार उत्तर प्रदेश पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही एक मोठी टोळी असून, ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना रमवले जाते. मग त्यात अडकवले जाते. त्यानंतर त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेनवॉश केला जातो. अशाप्रकारे ही मुले ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराची शिकार होतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in